⚡मालवण ता.१८-:
मालवण येथील फोवकांडा पिंपळ रिक्षाचालक-मालक मंडळातर्फे देवदिवाळीनिमित्त ५० वी श्री सत्यनारायण महापूजा शुक्रवार, २१ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम २१ व २२ नोव्हेंबर रोजी फोवकांडा पिंपळ येथे आयोजित करण्यात आले आहेत. शुक्रवार, २१ रोजी सकाळी ११ वाजता सत्यनारायणाची महापूजा, दुपारी २ वाजता तीर्थप्रसाद, सायंकाळी ६ वाजता बुवा अजित गोसावी यांचे सुश्राव्य भजन, रात्री ८.३० वाजता कलांगण मालवण प्रस्तुत ऑर्केस्ट्रा ‘स्वरअक्षय’ सादर होणारआहे. शनिवार, २२ रोजी दुपारी १ वा.पासून महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता शालेय स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्रम, ६.३० वाजता लकी ड्रॉ सोडत, रात्री ९ वाजता श्री भुतेश्वर प्रासादिक भजन मंडळ, खुडी-देवगड (बुवा संतोष जोईल, पखवाज अक्षय मेस्त्री, तबला मांगरीश घाडी) विरुद्ध आई भाग्यलक्ष्मी संगीत साधना प्रासादिक भजन मंडळ (बुवा अजित गोसावी, पखवाज संदीप मेस्त्री, तबला प्रेम मेस्त्री) यांच्यात २०x२० डबलबारीचा सामना रंगणार आहे.
या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन फोवकांडा पिंपळ रिक्षाचालक-मालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.
