तीन प्रभागांमध्ये भाजपच्या उमेदवारांकडून प्रतिस्पर्धी उमेदवारांवर आक्षेप…

शपथपत्र वाद, हरकतींचा वर्षाव:कणकवलीत छाननीत चुरशीचा कल्लोळ..

कणकवली ता.१८- : कणकवली नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्जाच्या छाननी प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेमध्ये प्रभाग क्रमांक ३ मध्ये कणकवली शहर विकास आघाडी पॅनलचे क्रांतिकारी विचार पक्षाचे उमेदवार सुमित राणे यांच्या नामनिर्देशन पत्रासोबत जोडलेले शपथ पत्र च्या मुद्द्यावरून प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार स्वप्नील राणे यांनी छाननी दरम्यान हरकत घेतली आहे.

प्रभाग क्रमांक ५ मध्ये स्नेहा वाळके यांच्या विरोधात मेघा गांगण यांनी छाननी दरम्यान हरकत घेतली आहे. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक ६ मध्ये सुमेधा अंधारी यांच्या विरोधात स्नेहा अंधारी यांनी उमेदवारी अर्जावर छाननी दरम्यान आक्षेप नोंदवला आहे.

यामध्ये प्रामुख्याने घेण्यात आक्षेपांवर निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आक्षेप घेतलेल्या उमेदवारांबाबत काय निर्णय होणार ? की ते उमेदवार बाद होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान भाजपाच्यावतीने अॅड. राजेंद्र रावराणे यांनी युक्तिवाद केला. तर कणकवली शहर विकास आघाडी पॅनलचे क्रांतिकारी विकास पक्षाचे उमेदवार यांच्या वतीने अॅड. गणेश पारकर यांनी युक्तिवाद केला. त्यामुळे या प्रभागांमधील छाननी बाबत काय निर्णय येतो ते पाहणे अतिशय महत्त्वाचे असणार आहे.

You cannot copy content of this page