पाट हायस्कूलमध्ये रंगणार राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आणि जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा…

इंग्रजी माध्यम शाळेच्या नामकरणाचे औचित्य..

कुडाळ : एस्. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी ,पाट संचलित एस्. एल्. देसाई विद्यालय पाट व कै. सौ.सीताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालय तसेच कै. डॉ. विलासराव देसाई कला,वाणिज्य व विज्ञान उच्चमहाविद्यालयात इंग्लिश मीडियम स्कूलचा नामकरण सोहळा व प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षकांच्या गौरव समारंभाचे औचित्य साधून दिनांक 28, 29 व 30 नोव्हेंबर 2025 या तीन दिवसांच्या कालावधीत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा व जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे .
याचवेळी कै राधाबाई सामंत इंग्रजी मिडीअम स्कुल उद्घाटन सोहळा गौरव गुरुवर्यांचा यामध्ये दिगंबर सामंत कुटुंबीय, राजन हंजनकर, गुरुनाथ केरकर, तानाजी काळे यांचा सन्मान करण्यात येणार आहे .
या सर्व उपक्रमासोबत उत्कंठावर्धक क्रीडा स्पर्धेचा आस्वाद पाट पंचक्रोशी तसेच जिल्ह्यातील रसिक क्रीडाप्रेमींनी ‘घ्यावा असे आवाहन संस्था अध्यक्ष दिगंबर सामंत, कार्याध्यक्ष देवदत्त साळगांवकर, सचिव विजय ठाकूर तसेच सर्व संस्था पदाधिकारी व प्रशालेचे मुख्याध्यापक राजन हंजनकर व पर्यवेक्षक सयाजी बोंदर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page