21 च्या 21 निवडून आणू…!

संजू परब:माझ्यासोबत दीपकभाई..

सावंतवाडी : दीपक केसरकर यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर आम्ही ही लढाई जिंकू, जनतेची कामं आम्ही केलीत. विजय आमचा निश्चित आहे. २१ च्या २१ जागा निवडून आणू असा दावा माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केला.

तसेच माझ्यासोबत दीपकभाई आहेत. त्यामुळे फरक पडत नाही‌. जनतेची साथ आम्हाला आहे असा विश्वास श्री. परब यांनी व्यक्त केला. त्यांच्या विरोधात विरोधकांनी आखलेल्या रणनितीबाबत विचारलं असता ते बोलत होते. प्रभाग क्रमांक ७ मधून त्यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page