⚡वेंगुर्ला ता.१६-: वेंगुर्ला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2 डिसेंबर रोजी होत आहे. दरम्यान आज रविवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी दुपारी शिवसेना पक्षाने माजी मंत्री शालेय शिक्षणमंत्री तथा आ. दिपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातून शक्ती प्रदर्शन करीत थेट नगराध्यक्षसाठी नागेश मोहन उर्फ पिंटू गावडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी नगरपरिषद स्वामी विवेकानंद सभागृहात नि. नि. अधिकारी ओंकार ओतारी व सहाय्यक नि. नि. अधिकारी हेमंत किरुळकर यांच्या उपस्थितीत अर्ज स्वीकारण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर , शहरप्रमुख उमेश येरम, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, सुरेंद्र चव्हाण, ऍड. श्रद्धा बाविस्कर आदी उपस्थित होते. तत्पूर्वी आ. केसरकर यांनी शिवसेना कार्यालय येथे शिवसैनिकांना संबोधित केले. तदनंतर जनसमुदायसह शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनिल डुबळे, उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, बाळा दळवी, मितेश परब, काशिनाथ नार्वेकर, संजय परब, सत्यवान साठेलकर आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
वेंगुर्ला नगरपरिषद थेट नगराध्यक्षसाठी शिवसेनेतर्फे नागेश गावडे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज…
