⚡वेंगुर्ला ता.१६-: वेंगुर्ला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2 डिसेंबर रोजी होत आहे.
दरम्यान आज रविवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता वेंगुर्ला शिवसेना पक्षाच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.यासाठी माजी शालेय शिक्षणमंत्री व आमदार दिपक केसरकर उपस्थित राहणार आहेत. शिवसेना पक्ष वेंगुर्ले शहर व ग्रामीण भागातील सर्वपदाधिकारी, शिवसैनिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी केले आहे.
वेंगुर्ला नगरपरिषद साठी शिवसेना करणार आज अर्ज दाखल…
