सीमा मठकर यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज केला दाखल…

⚡सावंतवाडी ता.१३-: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून सौ. सीमा मठकर यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या रूपाने पंचवार्षिक निवडणुकीसाठीचा हा पहिलाच अर्ज ठरला आहे‌. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील, सहा‌. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल केलं आहे.

यावेळी माजी खासदार विनायक राऊत, उबाठा शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ आदी उपस्थित होते. श्री. राऊत म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार आम्ही सावंतवाडीत नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. स्व. आमदार जयानंद मठकर यांच्या सुनबाई सौ. सीमा मठकर रिंगणात उतरल्या आहे. विजयाची आम्हाला खात्री आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर उमेदवार सौ. मठकर यांनी आपला विजय निश्चित असून आपल्यासह नगरसेवक पदाचे उमेदवारही बाजी मारतील असा दावा केला आहे.

You cannot copy content of this page