*💫सावंतवाडी दि.०१-:* राष्ट्रवादीचे नेते तथा माजी राज्यमंत्री प्रविण भोसले हे काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव सापडले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचाराअंती त्यांनी कोरोनावर मात केली असून, ते कोरोना मुक्त झाले आहेत. आज ते सावंतवाडी येथील सालईवाडा येथील निवासस्थानी येणार आहेत. यापूर्वी संजु विरनोडकर आणि टीमने त्यांच्या पूर्ण घरात आणि परिसरात निर्जंतुकीकरण केले आहे.
माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांची कोरोनावर मात
