हडी येथील कालिका मंदिरात आज त्रिपुरारी पौर्णिमा जत्रोत्सव…

⚡मालवण ता.०३-:
हडी येथील कालिकादेवी मंदिर येथे त्रिपुरारी पौर्णिमा जत्रोत्सव मंगळवार दि. ४ नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.

यानिमित्त सकाळी ६ वाजता देवीच्या मंगल स्नानाने कार्यक्रमाची सुरुवात, सकाळी ७ वाजता देवीला सुवासिक फुलांची मनमोहक आरास, ८.३० वाजता महाआरती, ९ वाजता ओटी भरण्यास प्रारंभ व नवसाची पूर्तता, ११ वाजता गावराठीचे देव नागेश्वर मंदिर येथून कालिका मंदिर येथे आगमन, सायंकाळी ७ वाजता दीपोत्सव, ७.३० ते रात्री १० पर्यंत महाप्रसाद, १० वाजता गडगेवाडी सेवा मंडळ, हडी यांचे भजन, पोथी वाचन व बारापाच मानकऱ्यांच्या हस्ते गणेश पूजन, १२ वाजता गावराठी व पालखी प्रदक्षिणा सोहळा होणार आहे. भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page