शिवसेनेला राजन तेलींच्या रुपाने नेता मिळाला-: आ. निलेश राणे…

कणकवली : महायुती म्हणून जिल्ह्यातील जनतेने तीनही राणेंना जिंकून दिले.त्यामुळे जिल्ह्यातील विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी आमचे काम चालूआहे. दसºयाच्या मुहुर्तावर उपमु‌ख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथशिंदे यांनी माजी आ. राजन तेली यांना पक्षात प्रवेश दिला. तेली हे मूळशिवसैनिक असल्याने ते स्वगृही परतले आहेत

खा. नारायण राणे यांच्या सोबतच्या अष्टप्रदान मंडळातील सर्वच सदस्य आमच्या पक्षात दिसतील. राजनतेलींच्या रुपाने एक शिवसेनेला जिल्ह्यात नेता मिळाला आहे. उपमुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांना अभिप्रेत संघटनात्मक बांधणी होणार आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांमधील महायुतीबाबत निर्णय मुंबईत होईल , अशी माहिती आमदार निलेश राणे यांनी दिली.

कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत आम. राणे बोलत होते, यावेळी माजी आ. राजन तेली , उपनेते संजय आग्रे , संजय पडते ,उपजिल्हाप्रमुख हरेष पाटील, कणकवली विधानसभाप्रमुख संदेश सावंत- पटेल , युवासेना जिल्हाप्रमुख मेहूल धुमाळे , तालुकाप्रमुख दामू सावंत , मंगेश गुरव आदी पदाधिकारी उपस्थित होते .

आ. राणे म्हणाले, जिल्ह्यात सावंतवाडी , बांदा , कुडाळ , कणकवली याठिकाणीराजन तेली यांचे स्वागत करण्यासाठी शिवसेना उतरली आहे. खा. नारायण राणेयांच्यासमवेत काम करत असल्यामुळे तेली यांना अनेक वर्षांपासून गावाचीमाहिती आहे. या वयातही तरुणांना लाजवतील अशापद्धतीने ते काम करीत आहेत.आपल्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेलींच्या रुपाने चांगला नेतादिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती होईल , नाही होणार का निर्णय वरिष्ठ नेत्यांचा आहे. याबाबत खा. नारायण राणे,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकत्रिक चर्चा करून निर्णय घेतील.महायुतीतील मित्र पक्षाला त्रास होणार नाही असे काम करीत आहोत.

माझ्यामतदारसंघात विकासाचा बॅकलॉक आहे, ती कामे करत आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामासाठी जेवढा निधी आणता येईल तेवढे काम केले जाणार आहे.राजन तेली यांचा प्रवेश झाल्यानंतर अनेक लोक शिवसेनेत येणार आहेत.त्यांचे फोन येत आहेत. जे-जे पक्षात येतील , त्यांना मान-सन्मान आणि आदरदेण्याची जबाबदारी व आदर होणार हा त्यांना विश्वास आहे. शिवसेनेत कसलीहीअट न ठेवता प्रवेश होत आहेत. राजन तेली आल्यामुळे अनेकांचे पक्षाचेदरवाजा उघडला आहे. आगामी काळात जिल्ह्यात विविध प्रवेश होतील, असे राणे
म्हणाले.

राजन तेली म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद देतो. मलाशिवसेना पक्षात प्रवेश दिला. आ. निलेश राणे आणि आ. दीपक केसरकर यांनाधन्यवाद देतो. आता शिवसेना वाढली पाहिजे. कारण कोकण म्हटल्यावर बाळासाहेबठाकरे यांचा बालेकिल्ला होता. त्यामुळे गावागावांत संघटना वाढली पाहिजे.गावागावांत जावून तिथल्या कार्यकर्त्यांना भेटून स्थानिक प्रश्न मार्गीलावण्याचे काम शिवसैनिकांनी केले पाहिजे. तहसीलदार असेल पोलीस स्टेशनकिंवा आरोग्य विभाग असेल शिवसैनिकांनी धावण्याची गरज आहे. कणकवलीविधानसभा मतदारसंघात गावनिहाय दौरा निश्चित करा , मी रात्रंदिवस तुम‌च्यासोबत फिरायला तयार आहे. संघटना नसली तर महायुतीत उमेदवारी कशी मिळणार?आता निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यामुळे सर्वांनी मेहनत केली तरच यश मिळेल.

राजन तेली व जिल्हा बँक विषयात मी समन्वय ठेवणार
राजन तेली यांना नोटीस आली अशी बातमी आली.कुठलीही शहानिशा न करता आलेली बातमी होती. आता राजन तेली व पालकमंत्री यांच्यात झालेली वक्तव्य याबाबत मी समन्वय ठेवणार आहे. जिल्हा बँकेशी देखील माझी चर्चा असेल. महायुतीत कुठलेही गैरसमज असतील , तर ते दूर केले जातील. कुडाळ मध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष काम करत आहेत,कणकवलीत राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष काम करत आहेत.जिल्हा आहे, शिवसेना संघटना वाढीसाठी कणकवलीत राजन तेली काम करतील . कोणी कुठेही वाढले तरी तुम्हाला त्रास होता कामा नये. उबाठावाल्यांनी आमच्याकडून काही नेत्यांना चोरून नेले होते. हे सर्व नेते ओरिजनल आहेत. तेच आमच्याकडे येत आहेत. महायुतीत कुठल्याही विषयात मी समन्वय ठेवणार असल्याची प्रतिक्रिया आ. निलेश राणे यांनी दिली.

You cannot copy content of this page