मेढा येथील काळबादेवी मंदिरात नवरात्रौत्सव उत्साहात संपन्न…!

⚡मालवण ता.०३-:
मालवण मेढा येथील श्री देवी काळबादेवी मंदिरात नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. या मंदिरातील नवरात्रौत्सवाला यावर्षी २५ वर्षे पूर्ण झाल्याने विविध कार्यक्रम पार पडले.

यानिमित्त नवरात्रीत रोज पूजा अर्चा व सायंकाळी महाआरती झाली. तर दि. २६ सप्टेंबर रोजी ललिता पंचमी व महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ झाला. तर नवरात्रौत्सव २५ वर्ष पूर्ती निमित्त १ ऑक्टोबर रोजीश्री बाबू धुरी यांच्या संकल्पनेतून व सर्व धुरी कुटुंबिय यांच्या सहकार्याने विविध कार्यक्रम संपन्न झाले. यामध्ये दुपारी महाप्रसाद, सायंकाळी महिला भजन मंडळ तारकर्ली यांचे सुगम भजन सादर झाले. तर सायंकाळी ७ वा. मंदिरात दीपोत्सव साजरा होऊन महाआरती करण्यात आली. या कार्यक्रमांना भाविकांनी गर्दी केली होती. तर दसऱ्या दिवशी महाआरतीने नवरात्रौत्सवाची सांगता झाली.

You cannot copy content of this page