बांदा पंचक्रोशीतर्फे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक मेळाव्याचे ५ रोजी आयोजन…!

⚡बांदा ता.०३-: ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदा पंचक्रोशीतर्फे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता ग्रामसचिवालय बांदा येथील ग्रामपंचायत सभागृहात करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रुपेश पाटकर (विख्यात मानसोपचार तज्ञ) व दयानंद गवस (सेवानिवृत्त उपअधीक्षक, महाराष्ट्र पोलीस तसेच अध्यक्ष ऑनकॉल रक्तदात संस्था सिंधुदुर्ग) उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यात वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सभासदांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे. सन्मानित होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकात प्रकाश पोखरे, श्रीकांत पेळपकर, रवींद्रनाथ मालवणकर, मधुकर म्हावळणकर, शुभदा गोवेकर, पद्मजा शिरोडकर, पार्वती तोरसकर, बाबा आईर, उर्मिला देसाई, गजानन मोर्ये, शिवराम सौंदेकर यांचा समावेश आहे.
या मेळाव्यास बांदा पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन मंचाचे अध्यक्ष अन्वर खान व सचिव गुरुनाथ नार्वेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page