Headlines

मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत तनिष्का परब प्रथम…

भारतीय सुराज्य संस्थेचे आयोजन..

⚡बांदा ता.०३-:
श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज कन्नूर यांच्याद्वारे संस्थापित भारतीय सुराज्य संस्थेच्या शाखा मडूरा – रोणापाल तर्फे आयोजित मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत तनिष्का राजन परब हीने प्रथम क्रमांक मिळविला. मडूरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. १ येथे सदर स्पर्धा संपन्न झाली.

या स्पर्धेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी हिंचेगिरी संप्रदायतील साधक ज्येष्ठ गुरुबंधू गणेश नाईक, सखाराम नाईक, अध्यक्ष दिनेश नाईक, किशोर देऊलकर, एकनाथ भोगटे, गजानन नाईक, बाळकृष्ण प्रभू, जितेंद्र नाईक, अशोक कुबल, प्रशालेच्या मुख्याध्यापिका मंजिरी झेंडे, शिक्षक श्री. बरागडे, निलेश महाले, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

स्पर्धेमध्ये तनिष्का राजन परब हिने प्रथम क्रमांक पटकविला. अहिल्या देवेंद्र सावळ हिने द्वितीय व चेतना रुपेश मडूरकर हिने तृतीय क्रमांक पटकविला.

विजेत्या स्पर्धकांना भारतीय सुराज्य संस्थेतील ज्येष्ठ गुरुबंधू गणेश नाईक, सखाराम नाईक, अध्यक्ष दिनेश नाईक आणि शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचलन जितेंद्र नाईक यांनी केले.

फोटो –
मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकान समवेत भारतीय सुराज्य संस्थेचे पदाधिकारी व पालक.

You cannot copy content of this page