⚡बांदा ता.३०-: सार्वजनिक नवरात्र उत्सव सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ बांदा येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बांदा विभागाच्या वतीने पोषण माह निमित्ताने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यात शासनाच्या वतीने १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या कालावधीत पोषण माह आयोजित करण्यात आला आहे. बालकांमधील वाढता लठ्ठपणा, कुपोषण कमी करणे, वडिलांचा बालसंगोपनातील सहभाग वाढविणे, बालकांना आहार व आरोग्य विषयक योग्य सवयी लावणे याबाबत समाजात जनजागृती करणे हा पोषण महाचा महत्वाचा उद्देश आहे.
बांदा केंद्र एक मधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी जनजागृतीपर फुगडी व पथनाट्य सादर केले. यावेळी भाजपच्या सिंधुदुर्ग महिला जिल्ह्याध्यक्ष श्वेता कोरगावकर उपस्थित होत्या. यावेळी पर्यवेक्षिका आर्यशीला देऊलकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बांदा केंद्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
फोटो:-
बांदा येथे पोषण माह निमित्त जनजागृती करताना बांदा केंद्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस.
बांदा विभागाच्या वतीने आयोजित पोषण माह निमित्ताने जनजागृती कार्यक्रम संपन्न…!
