जिल्ह्यात उद्या घर तेथे शोषखड्डा अभियान…

नागरिकांना सहभागी होण्याचे सीईओ खेबुडकर यांचे आवाहन..

⚡ओरोस ता ३०-: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने “स्वच्छता ही सेवा” मोहीम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यात राबविली जात आहे. जिल्ह्यातील सांडपाणी समुळ नष्ट करण्याकरीता १ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात घर तेथे शोषखड्डा अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात जिल्हावासियांनी सहभाग घेऊन श्रमदानाच्या माध्यमातुन शोषखड्डयाची उभारणी करावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे.
या वर्षी “स्वच्छता ही सेवा २०२५” साठी “स्वच्छोत्सव” ही थीम निश्चित करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हागणदारी मुक्त अधिक मॉडेल (ओडीएफ+ मॉडेल) होण्याच्या मार्गावर आहे. यामद्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, प्लॉस्टिक कचरा व्यवस्थाप, मैलागाळ व्यवस्थापन हे महत्वाचे मुद्दे आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सांडपाण्याचा प्रश्न सोडविण्याकरीता जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन १ ऑक्टोबर २०२५ रोजी स्वच्छता हि सेवा २०२५ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात घर तेथे शोषखड्डा अभियान राबविण्यात येणार आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांच्या माध्यमातुन नियोजन करण्यात आले आहे. तरी सर्व जिल्हावासियांनी दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी घर तेथे शोषखड्डा अभियान श्रमदान करुन शोषखड्याचे बाघकाम करावे असे आवाहन आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे.
फोटो:- रवींद्र खेबुडकर

You cannot copy content of this page