⚡मालवण ता.२७-:
ग्रामपंचायत गोळवण- कुमामे- डिकवल व प्राथमिक आरोग्य केंद्र गोळवण यांच्या संयुक्त विद्यमाने स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय गोळवण-कुमामे-डिकवल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्र गोळवण चे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप साळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी सरपंच श्री सुभाष लाड, उपसरपंच श्री शरद मांजरेकर ग्रामपंचायत सदस्य श्री. साबाजी गावडे सर, सौ. प्राजक्ता चिरमुले, ग्रामपंचायत अधिकारी सौ. मनवर , तसेच श्री प्रकाश चिरमुले, नंदादीप नाईक, रामकृष्ण नाईक, मुख्याध्यापक पाताडे , सुंदर लाड, मिलिंद पवार, गीतेश लाड, नामदेव चव्हाण, प्रभाकर गावडे, दिगंबर गावडे, माजी सरपंच प्रज्ञा चव्हाण, विनायक चिरमुले,सुरेखा लाड, व ग्रामपंचायत कर्मचारी करुणा राणे, बाबा परब, कोमल मांजरेकर, समिता गावडे, व वराडकर हायस्कूल कट्टा येथील विद्यार्थी व प्रा. श्री. कदम व श्री. रविंद्र गावडे अंगणवाडी सेविका, लीना जाधव, कविता पाडावे, मीना नाईक, समिधा नाडकर्णी, मयुरी लाड, डॉ. सौ सारिका साळुंके स्त्री रोग तज्ञ, डॉ. ऋचा भांडवले वैद्यकीय अधिकारी, डॉ. सौ सुरेखा कटरे वैद्यकीय अधिकारी गोळवण, तसेच आशा सेविका नगरकर, माने व आरोग्य विभाग कर्मचारी व २०५ ग्रामस्थ उपस्थित होते.
या शिबिरामध्ये रक्त तपासणी, BP, Sugar तपासणी, ॲक्सरे , प्रधानमंत्री जण आरोग्य कार्ड, आभा कार्ड, वयवंदना कार्ड, E.C.G, छातीचा ॲक्सरे, टेली मेडिसीन सल्ला व जनरल चेकअप या तपासण्या करण्यात आल्या. सर्व लाभार्थ्यांना औषधे वाटप ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवल व प्राथमिक आरोग्य केंद्र गोळवण यांच्या वतीने मोफत करण्यात आले.
सदरचे शिबिर ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवल व प्राथमिक आरोग्य केंद्र गोळवण यांनी यशस्वी केल्या बद्दल ग्रामस्थानी ग्रामपंचायतीच आभार व्यक्त केले.
