⚡मालवण ता.२७-:
कथालेखक प्रदीप केळुस्कर यांच्या तिसऱ्या कथासंग्रहाचे प्रकाशन रविवार 28 सप्टेंबररोजी मालवणमधील बॅ. नाथ पै सेवागंण येथे सायंकाळी साडेतीन वाजता होणार आहे. सांजतारा ‘असे या कथासंग्रहाचे नाव असून यात केळुस्कर यांच्या गाजलेल्या वीस कथा समाविष्ट केलेल्या आहेत.
न्यू व्हिजन पब्लिकेशन.. नाशिक यांनी हे दोनशे पानाचे पुस्तक तयार केले असून प्रा. नरसिंग आप्पासाहेब कदम(सदस्य.. मराठी विश्वकोष निर्मिती मंडळ व प्रोफेसर.. छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालय.. उदगीर. लातूर ) यांची प्रस्तावना या पुस्तकास आहे.
दिनांक 28 सप्टेंबर (रविवार ) दुपारी साडेतीनवाजता बॅ. नाथ पै सेवागणं.. मालवण येथे हा पुस्तक प्रकाशन कार्यक्रम होणार आहे.
साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक प्रा. प्रवीण बांदेकर यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमासाठी असणारं आहे. बॅ. नाथ पै सेवागणचे अध्यक्ष मा. ऍड. देवदत्त परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.
