⚡मालवण ता.२७-:
मालवण येथील नगर वाचन मंदिर तर्फे कवी शरद साटम स्मृती जिल्हास्तरीय काव्यस्पर्धा शनिवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे रू. ७००/- व प्रशस्तीपत्रक, रू. ५००/- व प्रशस्तीपत्रक, तृतीय क्रमांक रु. ३००/- व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. वयवर्षे १८ व त्यावरील कोणतीही व्यक्ती स्पर्धेत सहभागी होऊ शकते. कविता स्वरचित व मराठी असावी. सामाजिक, प्रेमविषयक कवितांना प्राधान्य देण्यात येईल. कवितेमध्ये राजकीय विंडबन व अश्लीलता असू नये. कविता सादरीकरण अवधी ३ ते ५ मिनीटे असेल. स्पर्धकांनी आपल्या कविता बुधवार दि. ८ ऑक्टोबर पर्यंत पोहोचतील अशा रितीने श्री. संजय शिंदे, ग्रंथपाल, नगर वाचन मंदिर, मालवण, जि. सिंधुदुर्ग, मोबा. ९४२२२३४९५० या पत्त्यावर पाठवव्यात किंवा समक्ष आणून द्याव्यात. जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष श्री. उदयराव मोरे यांनी केले आहे.
