मालवणी बझारचा आदर्श कामगार पुरस्कार सौ. राधा पुजारे यांना जाहीर…!

⚡मालवण ता.२७-:
मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था लि. मालवण संस्थेमार्फत संस्थेच्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येणारा सन २०२४-२०२५ चा ‘आदर्श कामगार पुरस्कार’ संस्थेच्या कर्मचारी सौ. राधा कृष्णा पुजारे यांना जाहीर झाला आहे. सदर पुरस्काराचे स्वरुप रक्कम रु. ५ हजार, मानपत्र, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह असे आहे.

आदर्श कामगार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. पी. एल. मोहिते, उपाध्यक्ष श्री. एम. आर. सोनवडेकर, संचालक श्री. पी. एस. बागवे, श्री. एस. डी. तळवडेकर, श्री. एस. एम. गवंडी, श्री. एच. जी. प्रभू, श्री. जी. एम. कोकरे, श्री. एम. व्ही. परब, श्री. पी. आर. पारकर, श्री. व्हि. व्हि. मालंडकर, श्री. व्हि. एस. सातार्डेकर, श्री. एच. एस. तळवडेकर, श्री. आर. आर. खोबरेकर, सौ. जे. एस. हडकर, सौ. एस. के. गांवकर, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पी. व्ही. परब व कर्मचारी वृंद यांनी सौ. पुजारे यांचे अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page