⚡वैभववाडी ता.२६-:
स्व.श्री महादेव पटकारे स्मरणार्थ युवा मित्रमंडळाच्या वतीने आयोजित गजानृत्य स्पर्धा व भव्यदिव्य दसरा उत्सवाचे आयोजन दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी श्री महागणपती मंदिर सभागृह, पाचल बाजारपेठ, एस.टी. स्टँड शेजारी पाचल येथे करण्यात आले आहे
भव्य गजानृत्य स्पर्धा आणि दसरा उत्सवाला समाजातील अनेक सामाजिक प्रतिष्ठित नेते, मान्यवर तसेच स्थानिक प्रतिष्ठित मंडळी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे लांजा-राजापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार श्री भैयाशेठ उर्फ किरण सामंत यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे उत्सवाच्या जल्लोषाचे अधिकच समाजात चैतन्य पसरले आहे. दसरा सोहळ्याचे खास आकर्षण धनगरी कला, गजानृत्य स्पर्धेतील सहभागी संघांची मोनमोहक वेशभूषा,गजाची लयबद्ध धनगरी वाद्यांचे सादरीकरण हे असणार आहे.
युवा मित्रमंडळाने आखलेला दसरा सोहळा केवळ पाचल-राजापूरपुरता मर्यादित न राहता संपूर्ण कोकणातील समाजबांधवांनी मोठ्या उत्साहाने उचलून धरला आहे. पालघरपासून बांदा पर्यंतच्या सर्व समाजाने या सोहळ्याला कळकळीने प्रतिसाद दिला आहे. इतकेच नव्हे तर शेजारच्या कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातील समाजनेत्यांनीही या आयोजनाला मनःपूर्वक शुभेच्छा पाठवल्या आहेत.
गजानृत्य स्पर्धेच्या माध्यमातून परंपरेचे जतन, उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य व बंधुभाव वृद्धिंगत करण्याचे कार्य युवा मित्रमंडळ करत असल्याने हा उत्सव संपूर्ण कोकणासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
स्व.श्री महादेव पटकारे स्मरणार्थ युवा मित्र मंडळ पाचलकोंड धनगरवाडी आयोजकांनी समाजातील समाजबांधवांना या भव्यदिव्य सोहळ्यास मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर,पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्यास आवाहन केले आहे.
युवा मित्रमंडळ पाचलकोंड धनगरवाडी आयोजित गजानृत्य स्पर्धा व भव्य दसरा उत्सव…
