बौद्ध समाजाच्या घराच्या जमिनी मालकीच्या करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी…

सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचे आदेश:मुंबईत सांविधानी हितकारिणी महसंघा सोबत झाली बैठक..

ओरोस ता २५
पिढ्यानपिढ्या बौद्ध वस्तीत राहत असूनही घर असलेली जागा त्यांच्या मालकीची नाही. अशा बौद्ध कुटुंबांच्या नावावर त्या जमिनी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तात्काळ बैठक घ्यावी, असे आदेश राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सिंधुदुर्ग संविधानी हितकारणी महसंघा सोबत झालेल्या बैठकीत दिले आहेत. मुंबई येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून झालेल्या या बैठकीत मंत्री शिरसाट यांनी जिल्ह्याची राजधानी सिंधुदुर्गनगरी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सभागृहासाठी चार कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष महेश परुळेकर यांनी दिली.
जिल्हा परिषद मधील पत्रकार कक्षात याबाबत माहिती देण्यासाठी संविधानी हितकारणी महसंघ सिंधुदुर्ग यांनी गुरुवारी दुपारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी अध्यक्ष परुळेकर यांनी माहिती दिली. यावेळी जिल्हा संघटक अंकुश जाधव, सल्लागार ऍड एस के चेंदवणकर, उपाध्यक्ष प्रभाकर जाधव, विश्वनाथ पडेलकर, सरपंच सुशील कदम, कुडाळ तालुका संयोजक विनोद कदम, किरण जाधव, महासचिव गौतम खुडकर, निलेश जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना श्री परुळेकर यांनी, पालकमंत्री राणे यांनी महाराष्ट्रात प्रथमच जिल्ह्यातील आमच्या समाजासाठी जनता दरबार घेतला. जिल्हास्तरावर असलेले प्रश्न त्यांनी जागीच निकाली काढले. परंतु अनेक प्रश्न राज्य शासन आणि केंद्र सरकार यांच्याशी निगडित होते. यासाठी त्यांनी सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांच्या समवेत मुंबई येथे बैठक घेतली. यावेळी मंत्री राणे स्वतः उपस्थित होते. तसेच ऑनलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर उपस्थित होते. २३ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.

You cannot copy content of this page