बांदा येथील हॉटेल कावेरीला आग मोठ्या प्रमाणात नुकसान…

⚡बांदा ता.२४-:
येथील हॉटेल कावेरीला आज रात्री साडेदहाच्या सुमारास आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, आग लागली तेव्हा हॉटेल सुरू होते आणि तिथे ग्राहकही उपस्थित होते. अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच, सावंतवाडी पालिकेचा अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.
​या मदतकार्यात बांदा पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, उपनिरीक्षक शिवराज झाजुर्णे आणि अशोक वाटिका ग्रुपचे सदस्य सहभागी झाले होते. सर्वांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
​हॉटेल कावेरीला आग लागल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. या घटनेमुळे हॉटेलचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

You cannot copy content of this page