१४ लाख ६८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त:एक संशयित आरोपीला अटक..
⚡बांदा, ता.२४-: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आज सकाळी बांदा पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करत अवैध दारू व वाहन असा एकूण ₹१४ लाख ६८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एक आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा अज्ञात आरोपी फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २४ सप्टेंबर रोजी पहाटे ५.१५ वाजता कोठावळेबांध, इन्सुली-मुंबई-गोवा महामार्गावर ही कारवाई करण्यात आली. यात महेश मारुती मोरये (रा. नांदगाव, ता. कणकवली) याला ताब्यात घेण्यात आले असून दुसरा अज्ञात इसम पसार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा बनावटीची अवैध दारू (किंमत ₹३ लाख ६८ हजार ४००) आणि Hyundai Creta कार (किंमत ₹११ लाख) असा एकूण ₹१४ लाख ६८ हजार ४०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ अ, ई, ८१, ८३ अन्वये करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई मा. श्री. मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग व मा. कु. नयोमी साटम, अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
यामध्ये पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हवालदार विल्सन डिसोजा, सदानंद राणे, डॉमनिक डिसोजा, जॅक्सन घोन्सालविस, आशिष जामदार आणि पोलीस अंमलदार महेश्वर समजिसकर यांनी सहभाग घेतला.
या कारवाईमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध दारू वाहतूक साखळीला मोठा धक्का बसला आहे.
