⚡मालवण ता.२२-:
दरवर्षी प्रमाणे यंदाही नवदुर्गा कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ विरण आयोजित भव्य नवरात्रौत्सव धुमधडाक्यात सुरू झाला असून २२ सप्टेंबर ते २ आकटोबर २५ या कालावधीत विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या मध्ये दररोज दुर्गा देवीची पूजा, आरती प्रसाद, सायंकाळी ७ वाजता ग्रामस्थांची सुस्वर भजने, त्या नंतर गरबा, दांडीया तर भाविक आणि रसिकांच्या मनोरंजनासाठी २२ सप्टेंबर रोजी रात्री होम मिनिस्टर कार्यक्रम त्यांचे प्रमुख पाहुणे राकेश नेमळेकर ,२४ सप्टेंबर रोजी मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग,२७ सप्टेंबर रोजी रात्री ९वाजता वेशभूषा स्पर्धा,२८ सप्टेंबर रोजी रात्री ९वाजता सम ई नृत्य,२९ सप्टेंबर रोजी ओमकार डान्स अकॅडमी सावंत वाडी यांचा कलाविष्कार, १ आकटोबर रोजी दुपारी १वाजता देवीचा महाप्रसाद, रात्री ८वाजता रेकॉर्ड डान्स, रात्री ९वाजता १००बक्षिसांच्या लकी ड्रॉ ची सोडत व २ आकटोबर २५रोजी
सायंकाळी ५वाजता भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे तरी या संपूर्ण नवरात्र उत्सवाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे
विरण बाजारपेठेतील हनुमान मंदिर येथे हा नवरात्र उत्सव गेली अनेक वर्षे नवदुर्गा कला क्रीडा, सांस्कृतिक मंडळ व रिक्षा युनियन व अनिल भाई कांदळकर, रामदास भाई पांजरी, विलास पांजरी , दत्ताराम आंबेरकर यांच्या सह स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्याने चांगल्या प्रकारे पार पडत आहे.
या नवरात्रोत्सवासाठी भव्य मंडप,डेकोरेशन, रंगमंच, आकर्षक विद्युत रोषणाई, सुमधुर साउंड सिस्टीम व आई नवदुर्गा देवीची मन प्रसन्न करणारी विलोभनीय मूर्ती हे या उत्सवाचे खास वैशिष्ट्य आहे.तरी या संपूर्ण नवरात्र उत्सवाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नवदुर्गा कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व रिक्षा युनियन विरण यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रौत्सव धुमधडाक्यात सुरू…
