Headlines

आगामी स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी काँग्रेसची आढावा बैठक संपन्न…!

⚡सावंतवाडी ता.२२-: सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रभारी रामचंद्र उर्फ आबा दळवी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री इरशाद शेख व जिल्हा कार्याध्यक्ष श्री विलास गावडे यांच्या प्रमुख उपस्थित व सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री महेंद्र सांगेलकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

या बैठकीला येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती,नगर परिषदेच्या निवडणुकी संदर्भात प्रत्येक गावनिहाय नगरपरिषदेच्या वॉर्डनिहाय प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर स्वतंत्र जबाबदारी देऊन पुढच्या सर्व ग्राम कमिट्यांच्या व वार्ड कमिट्यांच्या सर्व सेलच्या नियुक्त्या करून त्या त्या गावांमध्ये बैठकीचे आयोजन करून सर्व अहवाल पंधरा दिवसांमध्ये सादर करण्याचे सूचना श्री जिल्हा प्रभारी आबा दळवी यांनी दिल्या. निवडणुकीला सर्व ताकदीनिशी कार्यकर्ते यांना उभे करण्याची हमी प्रदेश काँग्रेसच्या वतीने श्री दळवी यांनी दिली. ही बैठक पाच ते सहा तास असंख्य कार्यकर्ते यांच्या उपस्थित घेण्यात आली. या बैठकीला खालील प्रमाणे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
सावंतवाडी तालुकाध्यक्ष -महेंद्र सांगेलकर जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते-ऍड. दिलीप नार्वेकर जिल्हा सरचिटणीस,- रवींद्र म्हापसेकर शहराध्यक्ष -ऍड. राघवेंद्र नार्वेकर, ऍड. संभाजी सावंत, प्रकाश बांदेकर,सुधीर मल्हार, स्मिता टिळवे, आमिदी मिस्त्री,जास्मिन लक्ष्मेश्वर, कौस्तुभ पेडणेकर, आनंद कुंभार, विनोद मल्हार, अशोक लाटे,प्रतीक सावंत, सुनील सावंत, आबा मांजरेकर, कृष्णा धाऊसकर,प्रतीक्षा भिसे, माया चिटणीस,सत्यवान शेडगे, समीर भाट, शाहरुख खान, सुभाष नाईक,अभिजीत जाधव,संजय लाड, विल्यम सालदाना, हर्षवर्धन धारणकर, रफिया नाईक, ज्ञानेश्वर पारधी, शिवा गावडे, गुणाजी गवस, भाऊसाहेब देसाई, इसफास पिटो, अरुण नाईक, संतोष मडगावकर, विजय ओटवणेकर, रुपेश आईर, सुभाष दळवी, हरिश्चंद्र मांजरेकर,रमेश जाधव,सुमेधा सावंत, बासित पडवेकर, बाळासाहेब नंदीहळी,विभावरी सुकी, अभय मालवणकर, सुरेश निर्गुण, तवकीर शेख,गणेश मिरजकर, मायविन पिन्टो, संतोष तावडे, पीटर फर्नांडिस, संतोष कासकर. सिद्धेश मांजरेकर

You cannot copy content of this page