⚡वेंगुर्ला ता.२१-: चिपी-कालवंडवाडी येथे खाडीपात्रामध्ये तारकर्ली पुलाच्या शेजारी अवैद्य वाळू उत्खनन करणा-या दोन होडींवर २१ सप्टेंबरच्या मध्यरात्री वेंगुर्ला तहसिलदार ओंकार ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग व पोलिस ठाणे यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मोठी कारवाई केली. या कारवाईत उत्खनन करणा-या दोन बोटी जप्त करण्यात आलेले असून त्यातील अंदाजे पाच ब्रास वाळू हस्तगत केली आहे. तर बोटीवर काम करणारे परराज्यातील ७ कामगारांना निवती पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.
या कारवाईत परराज्यातील विर बहादूर संकर, विवेक बाबा, संतु बाबा, हिन्दू यादव, जितेंद्र सहा, ज्युव यादव, राजन बहर सर्व राहणार बहरिया, जिल्हा बलीया, राज्य उत्तरप्रदेश यांच्यावर निवती पोलीस स्थानकात पुढील कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भीमसेन गायकवाड, ग्राम महसूल अधिकारी रजनीकांत नायकोडे, गौतम सुतार, नामदेव मोरे, पोलीस हवालदार कदम, पोलीस ड्रायव्हर लोणे, पोलीस पाटील संदेश पवार यांनी ही कारवाई केली.
फोटोओळी – बोटीमध्ये सापडलेली वाळू जप्त करण्यात आली.
अवैद्य वाळू उत्खनानवर वेंगुर्ला महसूल विभागाची मोठी कारवाई…!
