विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन..
कणकवली : कणकवली तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने यावर्षी नवरात्रोत्सवानिमित्त भव्य धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आयोजित कार्यक्रम पुढीलप्रमाणे –
सोमवार २२ सप्टेंबर रोजी देवीची मिरवणूक, सकाळी ९ वा. श्री पटकी देवी – बाजारपेठ मार्गे देवीचे आगमन, सकाळी १० वा. प्राणाप्रतिष्ठापना, दुपारी ३ वा. नंतर सुस्वर संगीत भजने, रात्री ८ वा श्रीदेवी भूमिका दशावतार नाट्य मंडळ मळगाव यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
२३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वा. कुंकूमार्जन पूजा, दुपारी ३ वा. नंतर सुस्वर भजने, रात्रौ ८ वा. देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ चेंदवण यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
२४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वा. कुंकुमार्जन पूजा, दुपारी ३ वा. नंतर सुस्वर संगीत भजने, रात्रौ ८ वा. पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
२५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वा. कुंकुमार्जन पूजा, दुपारी ३ वा. नंतर सुस्वर संगीत भजने, रात्रौ ८ वा. लोकराजा कै. सुधीर कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
२६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वा. कुंकुमार्जन पूजा, दुपारी ३ वा. नंतर सुस्वर संगीत भजने, रात्रौ ८ वा. दांडिया व फुगडी नृत्य होणार आहे.
२७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वा. कुंकुमार्जन पूजा, दुपारी ३ वा. नंतर सुस्वर संगीत भजने, रात्रौ ८ वा. भाई कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर यांचा ट्रिकसिनयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग मेहेंदिपूरचा बालाजी अर्थात सुडाग्नी हा नाट्यप्रयोग होणार आहे.
२८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वा. कुंकुमार्जन पूजा, दुपारी ३ वा. नंतर सुस्वर संगीत भजने, रात्रौ ८ वा. नाथा नालंग प्रस्तुत वालावलकर दशावतार नाट्य मंडळ ओसरगाव यांचा दशावतारी नाट्य प्रयोग होणार आहे.
२९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वा. कुंकुमार्जन पूजा, दुपारी ३ वा. नंतर सुस्वर संगीत भजने, रात्रौ ८ वा. वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ तेंडोली यांचा ट्रिकसिनयुक्त अयोध्याधीश श्रीराम हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
३० सप्टेंबर रोजी सकाळी ८ वा. कुंकुमार्जन पूजा, सकाळी १० वा. सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वा. तिर्थप्रासाद व महाप्रसाद, दुपारी ३ वा. नंतर सुस्वर संगीत भजने, रात्रौ ८ वाजता बुवा श्री. सुशील गोठणकर व बुवा श्री. भालचंद्र केळुसकर यांचा डबलबारी भजनांचा जंगी सामना होणार आहे.
१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वा. कुंकुमार्जन पूजा, दुपारी ३ वा. सुस्वर संगीत भजने, रात्रौ ८ वा. शरद मोचेमाडकर प्रस्तुत जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ आरोस यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
२ ऑक्टोबर रोजी सकलाई ८ वा. कुंकुमार्जन पूजा, रात्रौ ८ वा. बुवा श्री. गुंडू सावंत विरुद्ध बुवा श्री. दीपक नानचे यांचा डबलबारी भजनांचा जंगी सामना होणार आहे.
३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वा. देवीची विसर्जन मिरवणूक निघणार आहे. तरी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी कणकवलीच्या वतीने करण्यात आले आहे.
