रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवशी किल्ले विजयदुर्गचा परिसर झाला चकाचक…

भाजपा पडेल मंडलने शिवरायांचा वारसा जपत साजरा केला भाजपा प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस..

देवगड – भाजपाच्या सेवा पंधरावडा दरम्यान प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त किल्ले विजयदुर्ग च्या सर्व परिसरात पडेल मंडल भाजपातर्फे आज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 200 कार्यकर्ते आणि 40 ग्रास कटर मशीन ने आज जागतिक वारसा स्थळ असलेल्या किल्ले विजयदुर्ग परिसरात स्वच्छता मोहीम राबवुन पडेल मंडल भाजपा च्या पदाधिकारी कार्यकर्त्यानी छत्रपती शिवरायांचा ऐतिहासिक वारसा जपला असेच म्हणावे लागेल. पडेल मंडलाच्या वतीने भाजपा प्रदेश अध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज विजयदुर्ग किल्ला परिसर स्वच्छ करण्याचे अभियान पार पडले, या स्वच्छते मोहिमेसाठी ४० गवत कापण्याच्या मशीन व २०० कार्यकर्यांचा सहभाग होता यामध्ये शलेय विधार्थी व महिलांचा सहभाग लक्षनीय होता
अभियानाचा शुभारंभ किल्ल्यावरील भवानी देवीला गाऱ्हाणे घालून करण्यात आला यानंतर प्रत्येकी जणांचा गट तयार करून किल्ला अंतर्गत परिसर स्वच्छ करण्यात आला.
आज विजयदुर्ग किल्ला येथे राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात , पडेल मंडल अध्यक्ष महेश ( बंड्या )नारकर, बाळा खडपे जिल्हा पदाधिकारी रवी पाळेकर, डॉ. अमोल तेली, अरिफ बगदादी, संजय बोंबडी, पडेल सरपंच भूषण पोकळे, , भूषण बोडस,अंकुश ठुकरूळ,संजना आळवे, विजयदुर्ग सरपंच रियाज काजी, पडेल सरचिटणीस रवींद्र तिर्लॉटकर, रामकृष्ण राणे माजी पंचायत समिती सदस्या शोभा कदम प्रदीप साखरकर आनंद देवरुखकर महेश बीडये संजना आळवे विनोद सुके तसेच स्थानिक नागरिक बांधवांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. या स्वच्छता मोहिमेदरम्यान उपस्थित सर्वांनी मनापासून स्वीकारले की जागतिक वारसा नोंद झालेला हा विजयदुर्ग किल्ला ” स्वच्छ ठेवणे ही फक्त माझी जबाबदारी नाही, तर माझे कर्तव्य देखील आहे.”

You cannot copy content of this page