⚡सावंतवाडी ता.२०-: रवींद्रजी चव्हाण प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा चिटणीस श्री. सुधीर दळवी माध्यमातून व सहकार्यातून वह्या देण्यात आल्या.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोटगे नं. 1 या शाळेमध्ये घोटगे सरपंच सौ. भक्ती भरत दळवी व पोलीस पाटील सौ. स्नेहा सुधीर दळवी यांच्या हस्ते मुलांना वह्या वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी घोटगे गावचे सरपंच सौ. भक्ती भरत दळवी. उपसरपंच श्री. विजय दळवी, पोलीस पाटील सौ. स्नेहा सुधीर दळवी, ग्रामपंचायत सदस्य अजय दळवी, सौ. समीक्षा सतीश दळवी, सौ. मंजिरी महेश जाधव, सौ. स्वप्नाली दळवी ग्रामस्थ श्री. श्रीराम दळवी, मुख्याध्यापक श्री. वासुदेव चव्हाण, श्री. दिपक घाडी, श्री. रामा गवस उपस्थित होते.
