पुस्तकासोबत बाहेरचे जग देखील बघा…

वीरसिंग वसावे:कुडाळच्या कमशिप्र मंडळ इंग्रजी माध्यम शाळेत दाखल्याचे वितरण,एकूण ४६ दाखल्यांचे केले वितरण..

कुडाळ : पुस्तकासोबत बाहेरचे जग देखील पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे व्यवहार ज्ञान समजते. समाजात कसे वागायला पाहिजे याचे आकलन होते, असे प्रतिपादन कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी केले. सेवा पंधरवडा निमित्त जिल्हा प्रशासनामार्फत शाळा तिथे दाखला हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत आज कमशिप्र मंडळाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल्यांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून श्री. वसावे बोलत होते. यावेळी ४६ विद्यार्थ्यांना वय अधिवास आणि जातीच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
सेवा पंधरवडा निमित्त जिल्हा प्रशासनामार्फत शाळा तिथे दाखला हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत आज कमशिप्र मंडळाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल्यांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, शाळेच्या मुख्याध्यापिका शेख मॅडम उपस्थित होत्या. एकूण ४६ विद्यार्थ्यांना ४६ दाखल्यांचे वाटप करण्यात आले. चार जातीचे दाखले आणि ४२ वय अधिवास दाखल्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह तहसीलदार वीरसिंग वसावे, नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांच्या हस्ते हे दाखले स्वीकारले.
यावेळी बोलताना तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी शासनाच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाची माहिती दिली. विद्यार्थी आणि पालकांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता प्रॅक्टिकल ज्ञान घ्यावे. त्याचा समाजात वावरताना चांगला उपयोग होतो असे सांगितले. तालुक्यात २२५ जिल्हा परिषद शाळा आहेत. ३८ खासगी शाळा आहेत. त्यामध्ये कुडाळ इंग्लिश मीडियमची शाळा हि पहिली शाळा आहेत त्यांनी केवळ दोन दिवसात कागदपत्र पूर्ण करून ४६ विद्यार्थ्यांना दाखले मिळवून दिले. त्याबद्दल तहसीलदार श्री. वसावे यांनी शाळेचे कौतुक केले.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यपिका श्रीमती शेख मॅडम यांनी केले. तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी सुद्धा शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शेख याना पुष्पगुच्छ देऊन शाळेचे अभिनंदन केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका, पालक उपस्थित होते.

You cannot copy content of this page