गुलदारच्या रूपाने सिंधुदुर्गचे स्वप्न होणार साकार…!

⚡मालवण ता.१९-:
कोकणातील पर्यटन क्षेत्राला चालना मिळावी यासाठी सिंधुदुर्गातील निवती येथील समुद्र तळाशी देशातील पहिला जलपर्यटन प्रकल्प सुरु करण्यात येत आहे. तब्बल सहा वर्षांच्या पाठपुराव्यानंतर गुलदार आणि पाणबुडी च्या रूपाने हे स्वप्न साकार होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. येथील सागरी पर्यटनाला जागतिक दर्जा प्राप्त होण्यासाठी पर्यटनातील नाविन्यपूर्ण संकल्पना, त्याच्या जोडीला कौशल्य विकास आणि दर्जेदार संसाधनांची आवश्यकता होती. यासाठी अभ्यासकांनी प्रयत्न केले. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलेत त्या सर्वांचे आभार मानत असल्याची प्रतिक्रिया तारकर्ली विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

तारकर्ली पर्यटन विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी विजयदुर्ग बंदरात उभी असलेल्या निवृत्त युद्धनौका गुलादारला भेट दिली. यावेळी सहदेव साळगावकर, रवींद्र खानविलकर, मिलिंद झाड, शुभम झाट्ये, मनोज खोबरकर, राजन कुमठेकर, केदार झाड, संदीप बोडवे, मिथिलेश मिठबावकर, दर्शन वेंगुर्लेकर, हर्षल गंबीरराव, राजेश कुंटे, अभय पाटकर, पंकज धुरी, विकास ताम्हणकर, मुकेश आचरेकर, प्रसाद भोजने यांसह अन्य उपस्थित होते.

या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग हे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलपर्यटनस्थळाचे केंद्र बनणार आहे. कोकणातील पर्यटनक्षेत्र अधिक सक्षम होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे कोकण फक्त निसर्गसंपन्न नसून पर्यटनाच्या दृष्टीने देखील अधिक सक्षम होईल. यामुळे सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल केंद्र आणि महाराष्ट्र सरकार बरोबरच भारतीय नौदलाचे मनःपूर्वक आभार असे रवींद्र खानविलकर म्हणाले.

या प्रसंगी गुलदार युद्धनौकेचा प्रकल्प निवती येथे पूर्णत्वास जाण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल आणि दिलेल्या योगदाना बद्दल पत्रकार संदीप बोडवे यांचा तारकर्ली पर्यटन विकास संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी हर्षल गंबीरराव, उद्योजक केदार झाड यांचाही सत्कार झाला.

सिंधुदुर्गातील सागरी पर्यटनाला जागतिक दर्जा मिळावा यासाठी अहोरात्र झटणारे तसेच सिंधुदुर्गातील नावीन्यपूर्ण आणि दर्जेदार सागरी पर्यटनासाठी मोठी मेहनत घेणारे डॉ. सारंग कुलकर्णी, नाशिक बोट क्लबचे व्यवस्थापक धीरज चोपडेकर, इसादाचे व्यवस्थापक सूरज भोसले, स्कुबा प्रशिक्षक घनश्याम मोरजे, सहकारी संकेत गावडे, यांचेही यावेळी आभार मानण्यात आले.

You cannot copy content of this page