⚡मालवण ता.१८-:
मालवण कुंभारमाठ येथील श्री देवी जरीमरी मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे नवरात्रौत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त जरीमरी मंदिरात नवरात्रौत्सवात रोज सकाळी ९ वा. देवीचा अभिषेक, दुपारी १२. ३० वा. देवीची आरती, दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. देवीची आरती, रात्री ८ वा. भजने आदी कार्यक्रम होणार आहेत. ज्या भक्तांना महाप्रसादासाठी वस्तू किंवा देणगी द्यावायची असल्यास त्यांनी मंडळाकडे जमा करावी, अधिक माहितीसाठी ९१५८६८२०२२ व ९६०४४३२०२२ या क्रमांकांवर संपर्क साधावा, कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
