कणकवली येथे उद्धवसेनेतर्फे नवरात्रोत्सव…

कणकवली : उद्धवसेना तालुका कणकवलीच्यावतीने २२ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरपर्यंत ‘नवरात्रोत्सव २०२५’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

सोमवार २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता श्री दुर्गा मातेचे आगमन, सकाळी १० वाजता घटस्थापना व मातेची विधिवत पूजा,११ वाजता आरती, सायंकाळी ७वाजता स्थानिक कार्यक्रम, मंगळवार २३ रोजी सायंकाळी ७ वाजता देवीचा गोंधळ, रात्री ८ वाजता स्थानिक कार्यक्रम. २४ रोजी सायंकाळी ७ वाजता स्थानिक कार्यक्रम. २५ रोजी सायंकाळी ७ वाजता स्थानिक कार्यक्रम. २६ रोजी सकाळी ९ वाजता सहस्र नामावली पठण सायंकाळी ५ वाजता खेळ पैठणीचा. २७रोजी सायंकाळी ७ वाजता डबलबारी भजनाचा सामना – आई मोराई प्रासादिक भजन मंडळ, बोर्डवे, बुवा मकरंद मोडक विरुद्ध लिंग पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ, दारिस्ते, कणकवलीचे बुवा स्वप्निल गोसावी. ता. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता सुप्रसिद्ध जादूगार केतनकुमार यांचे जादूचे प्रयोग. २९ रोजी सायंकाळी ७वाजता ग्रामदेवता दशावतार नाट्यमंडळ, बिडवाडी यांचा नाट्यप्रयोग. ३० रोजी

सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, सायंकाळी ७ वाजता डबलबारी श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ, नाडण ता. देवगड बुवा संदीप पुजारे विरुद्ध श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, घोटगे ता. कुडाळचे बुवा विनोद चव्हाण यांच्यात होणार आहे.

सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा

१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता आजगावकर दशावतार नाट्य मंडळ यांचे दशावतारी नाटक. २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता आपटा पूजन, सायंकाळी ७ वाजता सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरूर यांचे दशावतारी नाटक. ३ रोजी सायंकाळी ४ वाजता देवीच्या मूर्तीची विसर्जन मिरवणूक असे कार्यक्रम होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन नवरात्र उत्सव मंडळ अध्यक्ष विलास गुडेकर, खजिनदार महेश कोदे, उद्धवसेना कणकवली तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, कन्हैया पारकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page