⚡मालवण ता.१७-:
रत्नागिरी , सिंधुदुर्ग चे माजी खासदार विनायक राऊत यांनी नुकतीच राठीवडे गावाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे सोबत मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर, नाना नेरुरकर,बंडु चव्हाण, रामचंद्र राऊत, विजय पालव, नितीन पालव ,राठीवडे सरपंच दिव्या धुरी ,उप सरपंच जाधव, स्वप्नील पुजारे सुशांत धुरी, संतोष धुरी, भगवान धुरी, जयराम गावकर, सुभाष धुरी
व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व प्रथम राठीवडे ग्रामदैवत श्री देव गांगेश्वर
मंदिरात जाऊन देवाचे दर्शन व आशीर्वाद घेतले. या वेळी राठीवडे गावाच्या वतीने सरपंच दिव्या धुरी स्वप्नील पुजारे, सुभाष धुरी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्या नंतर माजी उपसरपंच स्वप्नील पुजारे आणि पुजारे घराण्याच्या गणरायाचे दर्शन घेतले.पुजारे परिवाराच्या वतीने खास.विनायक राउत यांचा सत्कार करण्यात आला तर जेष्ठ कार्यकर्ते व समाज सेवक सुभाष धुरी यांच्या निवासस्थानी भेट देऊन उपस्थित कार्यकर्त्यांशी चर्चा केली
माजी खास.विनायक राउत यांनी राठीवडे गावाला दिली सदिच्छा भेट…!
