⚡सावंतवाडी ता.३१-: शनिवारी 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास गाव मौजे तळवणे खिरोईवाडी खार बंधारा येथील तेरेखोल खाडी पाण्यात एक अनोळखी पुरुष जातीचे मृतदेह सापडला असून त्याचे वय अंदाजे 43 असल्याचे अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याची सावंतवाडी पोलीस ठाणेमध्ये आकस्मिक मृत्यू रजिस्टर क्रमांक 58/2025 BNSS 194 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.या घटनेची खबर महादेव शशिकांत केरकर (वय 43 रा- तळवणे सुमेवाडी ता.सावंतवाडी) यांनी पोलिसांना दिली. घटनास्थळी सावंतवाडी पोलीस ठाण्याचेअंमलदार
पो नि अमोल चव्हाण, स पो नि शिंदे यांनी भेट देऊन आरोंदा पोलिस दुरक्षेत्राचे बीट अंमलदार अरवारी पोलीस निरीक्षण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत.मृत व्यक्तीच्या उजव्या हातामध्ये रुद्राक्षाची माळ असून अंगावर निळसर फिकट रंगाची जीन्स पॅन्ट व बनियन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तळवणे खाडीपत्रात अज्ञात पुरुषाचा सापडला मृतदेह…
