दुकानवाड ते शिवापूर पर्यंतचे ब्रिज केले सुस्थितीत, ब्रिजवरील सर्व खड्डे बुजविले:शिवापुर पर्यंत रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी साफ करून रस्ता केला मोकळा…
⚡कुडाळ ता.२५-: कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांची कार्यतत्परता शिवापूर, वसुली, दुकानवाड आंजीवडे , उपवडे या पंचक्रोशीतील जनतेने अनुभवली आहे. सततच्या पावसामुळे ब्रिज पाण्यात बुडाले आणि ब्रिजवर मोठमोठे खड्डे पडले. आमदार निलेश राणे यांनी हे खड्डे गणेश चतुर्थीच्या पूर्वी बुजून वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. मुंबई पुणे व इतर ठिकाणाहून येणाऱ्या गणेश भक्त चाकरमान्यांची गैरसोय होता नये. याची काळजी घेतली. त्याचप्रमाणे शिवापूर पर्यंतच्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा गवत आणि झाडी वाढलेली होती ती कापून रस्ता मोकळा करून घेतला. आमदार निलेश राणे यांनी स्वतः लक्ष घालून अधिकाऱ्यांना सूचना देऊन करून घेतलेल्या या कामाबद्दल पंचक्रोशीतील जनतेकडून आभार मानले जात आहेत. त्याचप्रमाणे गणेश भक्त चाकरमान्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
आमदार निलेश राणे जनतेच्या प्रत्येक मागणीची दखल घेतात याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून शिवापुर पर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे पाहता येईल. दुकानवाड वसुली कुत्रे कोण शिवापुर चाळोबा मंदिर येथील ब्रिज, शिवापुर वाण्याचे भाटले येथील ब्रिजच अशा सर्व पूलांवर मोठमोठे खड्डे पडले होते. गणेश भक्तांना त्रास त्रास होऊ नये श्री गणेशाचे आगमन मूर्तीची ने आण करताना त्रास होऊ नये यासाठी आमदार निलेश राणे यांना शिवापूर ग्रामपंचायत ने पत्रव्यवहार केला. प्रशासनाला पत्रव्यवहार केला. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार संतोष राऊळ यांनी या संदर्भातील माहिती आमदार निलेश राणे यांना दिली. या सर्व घटनेची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत गणेश चतुर्थीच्या शेवटच्या क्षणापर्यंत वाहतुकीत कोणत्याही अडथळा असता नाही अशा स्पष्ट सूचना आमदार निलेश राणे यांनी दिल्या. त्यानंतर शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी सुद्धा प्रशासनाने कामकाज केले.
पावसामुळे ब्रिजवर जेव्हढे खड्डे पडलेले होते ते सर्व बिजविले. पहिल्यांदा हे खड्डे एकदा बुजवण्यात आले मात्र गेल्या चार दिवसाच्या जोरदार पावसामुळे पुन्हा खड्डे पडले हे सर्व खड्डे बुजून ब्रिजवरील वाहतूक सुरळीत केली. शहरातून गणेश भक्त चाकरमानी गावी येताना अरुंद रस्त्याची साईड पट्टी चालकाला कळावी म्हणून रस्त्याच्या दुतर्फा असलेले गवत कापून शिवापूर पर्यंतचा रस्ताही मोकळा करण्यात आलेला आहे. पंचवीस वर्षात गणेश चतुर्थी पूर्वी अशा पद्धतीची सेवा प्रथमच आमदार निलेश राणे यांच्या सूचनेनंतर प्रशासनाने दिलेले आहे. त्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. सार्वजनिक बांधकाम सावंतवाडी विभागाचे कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन हे काम पूर्णत्वास नेले आहे.