आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार प्राणप्रतिष्ठापना..
⚡कुडाळ ता.२५-: कुडाळ येथे विराजमान होणाऱ्या सिंधुदुर्ग राजाचे आगमन आज सोमवारी २५ ऑगस्ट रोजी ढोल ताशांच्या गजरात आणि डीजेच्या तालावर भक्तिमय वातावरणात झाले. २७ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग राजाची प्राणप्रतिष्ठापना आमदार निलेश राणे यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता होणार आहे असे सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.
सिंधुदुर्ग राजा गणरायाचे यावर्षी १६ वर्ष आहे. गेल्या १६ वर्षापासून कुडाळ येथील पोस्ट कार्यालयाजवळ सिंधुदुर्ग राजाची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. यावर्षी सिंधुदुर्ग राजा २१ दिवसांचा असणार असून त्याचे आगमन आज सोमवारी २५ ऑगस्ट रोजी झाले. ढोल ताशांच्या गजरात आणि डीजेच्या तालावर, फटाक्यांची आतषबाजी करीत गणरायाचे आगमन झाले. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, जिल्हा सचिव दादा साईल, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, अरविंद करलकर, ओंकार तेली, कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, भाजप तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, कुडाळ शहर प्रमुख अभी गावडे, महिला शहर प्रमुख श्रुती वर्दम, नगरसेवक राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, प्रवक्ते रत्नाकर जोशी, युवती जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, भाजप शहर अध्यक्ष सुनील बांदेकर, रुपेश कानडे, उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके, राकेश कांदे, राकेश नेमळेकर, युवक तालुकाप्रमुख सागर वालावलकर, प्रसन्ना गंगावणे, नागेश नेमळेकर, रेवती राणे, विश्वास पांगुळ, बाळा पावसकर, चेतन पडते, चंदन कांबळी, अनुप्रीती खोचरे, संदेश सुकळवाडकर आदी उपस्थित होते.
यावर्षी सिंधुदुर्ग राजा २१ दिवसांचा असून पहिल्या दिवशी म्हणजे बुधवार २७ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता आमदार निलेश राणे यांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे तरी सर्व भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे