कुडाळ : तालुक्यातील माणगाव तिठा येथील हॉटेल सीतामाईचे मालक लिलाधर मनोहर मुंज (५६,रा..माणगांव तांबळवाडी) यांचे अल्पशा आजाराने रविवारी सकाळी कणकवली हाॅस्पीटल येथे निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने मंजु कुटुंबियांवर दुःखांचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मित्र परिवारातुन हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
माणगांव ढोलकरवाडी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात रविवारी सायंकाळी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, सुन, भाऊ, बहीण, पुतणे असा परिवार आहे.
माणगाव येथील लीलाधर मुंज यांचे निधन…
