पाट हायस्कूलमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा…

कुडाळ : तालुक्यात पाट हायस्कूल मधील इयत्ता आठवीच्या मुलांकडून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि विविध प्रकारच्या गणेश मूर्ती तयार केल्या. यामधून कुमार निरज परब याने प्रथम क्रमांक मिळवला तर इतर मुलांच्या ही सुंदर कलाकृती कलादालनात ठेवण्यात आल्या.


निसर्गाप्रती ओढ निर्माण व्हावी याकरिता इको क्लबची स्थापना पाट हायस्कूलमध्ये करण्यात आलेली आहे त्यांच्यातर्फे वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात यावर्षी पाट हायस्कूल आणि संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ, महाराष्ट्र जैवविविधता मंडळ. यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना प्रविण सावंत, कु.मयुरी चव्हाण, कु.प्रसाद गावडे, निखिल पाटकर. तसेच पाट हायस्कूल मुखपाध्यापक राजन हंजनकर पर्यवेक्षक सयाजी बोंदर कलाशिक्षक संदीप साळसकर यांनी मार्गदर्शन केले.

You cannot copy content of this page