रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी रूपेश राऊळ यांनी दोन नवीन व्हीलचेअर उपलब्ध करून दिल्या…

⚡​सावंतवाडी,ता.२२-:
सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी दोन नवीन व्हीलचेअर उपलब्ध करून दिल्या आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि आजारी प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
​गेल्या काही दिवसांपासून, प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर जाण्यासाठी वृद्ध आणि दिव्यांग प्रवाशांना मोठ्या अडचणी येत होत्या. या गैरसोयीची दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेतून व्हीलचेअर देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि आज प्रत्यक्ष तुतारी एक्सप्रेस सुटण्यापूर्वी या व्हीलचेअर्स रेल्वे स्थानक प्रमुख अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या.
​यावेळी बोलताना रूपेश राऊळ म्हणाले, “येत्या गणेश चतुर्थीच्या सणासाठी मोठ्या संख्येने प्रवासी येणार आहेत. या व्हीलचेअर्समुळे गरजू प्रवाशांची गैरसोय दूर होईल. ठाकरे शिवसेना कायमच सावंतवाडी टर्मिनसवर पायाभूत सुविधा आणि स्वच्छतेसाठी सहकार्य करत राहील.”
​या सेवेबद्दल स्टेशन मास्तर दिनेश चव्हाण यांनी प्रवाशांच्या वतीने आभार मानले आणि भविष्यातही असेच सहकार्य मिळत राहील अशी आशा व्यक्त केली. या प्रसंगी माजी सभापती रमेश गावकर, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, आरोंदा उपसरपंच आबा केरकर, कोकण रेल्वेचे एरिया सुपरवायझर विजय सामंत, सिनियर स्टेशन मास्तर दिनेश चव्हाण,ऑन ड्युटी स्टेशन मास्तर अनुराधा पवार, कमर्शियल सिनियर क्लार्क लक्ष्मण परब, शिवसेनेचे विभागप्रमुख सुनील गावडे,विनोद काजरेकर, संजय तानावडे, संतोष गावडे, सचिन मुळीक, रोहन मल्हार आदी उपस्थित होते.
सावंतवाडी रेल्वे टर्मिनस वर दोन व्हील चेअर उपलब्ध करून दिल्या आहेत असे सांगून रूपेश राऊळ यांनी गरजूंनी लाभ घ्यावा यासाठी सतर्क राहावे असे आवाहन केले.

फोटो
सावंतवाडी रेल्वे स्थानकावर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी दोन व्हील चेअर सुपुर्द केल्या. यावेळी रेल्वे अधिकारी विजय सामंत, दिनेश चव्हाण, रमेश गावकर आदी

You cannot copy content of this page