वैभव नाईक: पकडण्यात आलेली माणसं ही सर्व राणेंचीच असल्याचा केला आरोप..
⚡कणकवली ता.२२-: कणकवली शहरातील मटका जुगार अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी काल धाड टाकली. पोलिसांना त्याठिकाणी बोलावून घेत सदर आरोपींवर कारवाई करण्यात आली. मात्र कारवाई झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत आरोपींना कसे काय सोडण्यात आले? असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला. तर घटनेचा एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. त्या व्हिडिओमध्ये नितेश राणे हे आरोपींकडून गुन्ह्याची कबुली घेत असताना त्यातील एका आरोपीने “साहेब आम्ही तुमचीच माणसे आहोत” असे जाहीर रित्या बोलून दाखवले आहे. त्यामुळे ती माणसे तुमची असल्यामुळे अवघ्या दोन तासांत सुटली की काय? की त्यामागे अजून कोणते कारण आहे असा प्रश्न जनतेच्या आणि आमच्या मनात आहे. तरी पालकमंत्र्यांनी याचा खुलासा करावा असे आव्हान ही वैभव नाईक यांनी केले.