⚡बांदा ता.२२-: गणेश चतुर्थीचे औचित्य साधून रोट्रॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा यांनी रील स्पर्धेचे आयोजन केले आहे. सदर स्पर्धा ही बांदा पंचक्रोशी मर्यादित असेल. या स्पर्धेत रील बनवण्यासाठी वयोगट हा १८ वर्षे ते ३० वर्षे असा ठेवण्यात आला आहे.
सदर स्पर्धा ही गणेश चतुर्थीचे दहा दिवस चालणार असून स्पर्धा ही कुटुंबासोबत रील बनवून एखादा सामाजिक संदेश त्यातून द्यायचा आहे. सर्वोत्कृष्ट रील बनवणाऱ्या कुटुंबाला सन्मानित करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धाकांनी यात भाग घ्यावा असे आवाहन रोट्रॅक्टचे अध्यक्ष रोहन कुबडे यांनी केले आहे. रील पाठवायची अंतिम तारीख ही ५ सप्टेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत असेल. अधिक माहिती साठी रुपेश सावंत (मो. 72761 32203 किंवा संकेत वेंगुर्लेकर (मो. 8668485646) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रोट्रॅक्ट क्लब ऑफ बांदा तर्फे रील स्पर्धेचे आयोजन…!
