⚡बांदा ता.२२-: बांदा-पत्रादेवी रस्त्यावरील बांदेश्वर मंदिर ते लकरकोट दत्तमंदिर पर्यंत मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे रिक्षाचालक संघटना व बांदा ग्रामस्थ यांनी श्रमदानातून बुजवले. ऐन गणेश चतुर्थी काळात या रोडवर मोठ्या प्रमाणात पावसामुळे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. खड्डे बुजविण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे.
या मार्गावर गणेश चतुर्थी वाहतुकीची काळात मोठी वर्दळ असते. शेजारच्या गोवा राज्यातील लोक मार्केटसाठी बांदा बाजारपेठेत येत असतात याचा विचार करत येथील रिक्षा चालक संघटना यांनी पुढाकार घेत सदर खड्डे श्रमदानातून बुजवले. यासाठी माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जावेद खतिब यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी सुनील माजगावकर, उल्हास शेवडे, अनिल माजगावकर, दाजी परब, दशरथ परब, योगेश सावंत-मोर्ये, माजी उपसरपंच हर्षद कामत, अनिल म्हाडगूत, श्री गडेकर, ज्ञानेश्वर तारी यांनी सहभाग घेतला.
फोटो:-
बांदा येथे रस्त्यावरील खड्डे बुजविताना रिक्षा चालक-मालक.
बांदा पत्रादेवी रस्त्यावरील पडलेले खड्डे रिक्षाचालक संघटना व बांदा ग्रामस्थ यांनी श्रमदानातून बुजवले…
