⚡मालवण ता.३०-:
महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशन आयोजित व पुणे जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन यांच्या नियोजनात श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे दि. ९ ते १४ ऑगस्ट रोजी ७५ व्या ज्युनिअर मुले व मुली बास्केटबॉल राज्य स्पर्धा होणार आहेत. या राज्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सिंधुदुर्ग संघाच्या जिल्हा निवडीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशन तर्फे श्री सद्गुरु सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन संचलित डॉ. श्रीधर सिताराम कुडाळकर हायस्कूल मालवण च्या बास्केटबॉल मैदानावर शनिवार दि. २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता निवड चाचणीचे आयोजन केले आहे.
ज्या खेळाडूंची जन्म तारीख ०१/०१/२००७ नंतरची असेल अशा खेळाडूंना या निवड चाचणीमध्ये सहभागी होता येईल. निवड चाचणीसाठी येताना खेळाडूंनी सोबत आधार कार्ड व जन्म प्रमाणपत्र (ओरीजिनल) सोबत घेऊन यावे. अधिक माहितीसाठी सचिव अजय शिंदे (९४२२३९४१८६) यांच्याशी संपर्क साधावा. निवडचाचणी मध्ये जिल्ह्यातील बास्केटबॉल खेळाडूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ यांनी केले आहे.