⚡कणकवली -:
शहरातील-परबवाडी येथील रहिवाशी संदीप रमेश सरंगले (४६) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. परबवाडीतील सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असायचा. संदीप यांचा मनमिळावू व हसतमुख स्वभाव होता. त्यांच्या पश्चता आई, वडील, पत्नी, मुलगा, मुली, भाऊ, भावजया, बहीण असा मोठा परिवार आहे. कोकण रेल्वेचे कर्मचारी सचिन सरंगले यांचे ते चुलत बंधू होत.
रेल्वे कर्मचारी संदीप सरंगले यांचे निधन…!
