राजकारणाचा उपयोग ग्रामस्थांच्या हितासाठी करणारा युवा चेहरा म्हणजे संदीप गावडे…

⚡सावंतवाडी ता.२९-: राजकारणाचा उपयोग ग्रामस्थांसाठी, त्यांच्या हितासाठी करणारा युवा चेहरा म्हणजे संदिप एकनाथ गावडे. आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर अल्पावधीतच जनतेला आपलसं करणार हे नेतृत्व. मूळ फणसवडे येथील असणाऱ्या संदिपजींचा जन्म सावंतवाडीत झाला. डोंबिवली येथे त्यांनी आपल उच्च शिक्षण पूर्ण केल. एम.बी.ए फायनान्स ही पदवी त्यांनी संपादित केली. आई-वडिलांनी दिलेला समाजसेवेचा वारसा ते पुढे घेऊन गेले. जिल्हा परिषद अध्यक्ष असणाऱ्या मामा चंद्रकांत गावडे यांच्याकडून त्यांनी राजकारणाचे धडे घेतले‌. याचदरम्यान भाजपचे नेते, माजी कॅबिनेट मंत्री तथा भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या ते संपर्कात आले. रवीदादांच्या कार्यकर्तृत्वाने प्रभावीत होऊन त्यांनी राजकारणात सक्रियपणे उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त ग्लोबल महाराष्ट्र परिवाराकडून घेण्यात आला हा धावता आढावा.

डोंबिवली सारख्या ठिकाणी काम करत असतानाच आपल्या जन्मभूमीत देखील ते काम करू लागले. यातच २०१५ ला भाजप पक्षाकडून जिल्हा परिषद सदस्य पदासाठी त्यांना उमेदवारी देण्याच ठरलं. परंतु, आरक्षण पडल्यानं ही संधी हुकली. मात्र, जनतेची केलेली काम, विकासाच असणारं व्हिजन यामुळे पक्षान त्यांना पंचायत समिती लढवण्याचे आदेश दिले. पक्षादेश मानून संदीप गावडे यांनी विलवडे पंचायत समितीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. २०१७ ला मोठ्या मताधिक्याने ते या मतदारसंघातून विजयी झाले‌. पंचायत समिती सदस्य म्हणून मतदारसंघातील गावांच्या विकासावर त्यांनी जोर दिला. विलवडे, भालावल, कोनशी, सातोळी- बावळाट, केसरी-फणसवडे, देवसू दाणेली, पारपोली आदी गावांच्या पायाभूत सुविधांकडे त्यांनी लक्ष दिला. पंचायत समिती सदस्य कसा असावा याच एक उदाहरणच त्यांनी आपल्या पहिल्याच टर्ममध्ये दिलं.

यातच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विलवडे पंचायत समिती मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतींवर त्यांनी भाजपच कमळ फुलवल‌ं. त्यांच्या या कामाची पोचपावती म्हणून पक्षाने त्यांची आंबोली मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती केली. या कार्यकाळात आंबोली, चौकुळ व गेळे ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा रोवण्यात संदीपजींचा सिंहाचा वाटा होता. जिथे भाजपच कमळ फुलत नव्हतं तिथे त्यांनी भाजपच्या विचारांचा सरपंच बसवला. गेली अनेक वर्षे सामाजिक बांधिलकीतून ते विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. शालेय विद्यार्थांना वह्या वाटप, शालोपयोगी वस्तूंच वाटप ते करत आहेत. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ते हे कार्य अविरत करत आहेत. अभ्यासुपणे काम करणारा एक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. स्वतःला ते कधीही नेता समजत नाहीत. कार्यकर्ता म्हणूनच राहणं आपल्याला पसंत असल्याचे ते आवर्जून सांगतात.

    भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे ते विश्वासू शिलेदार आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांनी कोट्यावादीचे विकासकामं त्यांनी तालुक्यात केली आहेत. रस्ता, वीज, पाणी या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ते नेहमीच आग्रही राहीलेत. प्रसंगी शासनाची वाट न पहाता स्वतःच्या खिशातून खर्च करून त्यांनी या सुविधा ग्रामस्थांना उपलब्ध करून दिल्यात. विहीर, बोअरवेल मारून देत पाण्यासाठीची वणवण थांबवली‌ आहे. काळाची गरज ओळखून आंबोली घाटाला पर्यायी असणारा केसरी फणसवडे रस्ता व्हावा यासाठी ते आग्रही राहीले‌त. यासाठी रविंद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यामुळे हा रस्ता मंजूर झाला मंजूर केला. 

यासह क्रीडाप्रेमी विद्यार्थ्यांना भविष्यात संधी मिळावी यासाठी क्रीकेट चषक ते दरवर्षी भरवतात. जिल्ह्यातील फुटबॉल प्रेमींची संख्या व इथल्या भागात शेजारील गोवा राज्याप्रमाणे फुटबॉल खेळाला वाव मिळावा म्हणून फुटबॉल चषकाच आयोजन त्यांनी केले. बहुदा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलाच भव्य फुटबॉल चषक असावा. केवळ, यावर न थांबता त्यांनी टीम सिलेक्टरना आणत फुटबॉल प्रशिक्षण घेतलं. इथल्या मुलांना शास्त्रोक्त प्रशिक्षण दिल. त्या फुटबॉल पटूना स्कॉलरशिप दिली. एक कॉमनमॅन म्हणून ते राजकारणात सक्रिय आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून भाजपच्या माध्यमातून लोकांची काम करण्यासारखा दुसरा आनंद नाही अशी त्यांची भावना आहे‌‌. आबालवृद्ध आपल्याला त्यांच्या अडीअडचणींत फोन करतो, त्यांची सेवा करण्यात मला धन्यता प्राप्त होते असं ते आवर्जून सांगतात. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी मी या विचारांवर चालणारा हा भारतीय जनता पार्टीचा एक कट्टर कार्यकर्त्या आहे. अशा या दिलदार नेता ‘संदिप दादा’ला वाढदिवसाच्या ग्लोबल महाराष्ट्र परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा….!

You cannot copy content of this page