पेंडूर ग्रामीण रुग्णालयातील समस्यांबाबत ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून पाहणी…

उपनिवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. इंगळे यांची उपस्थिती..

⚡मालवण ता.२५-:
पेंडुर ग्रामीण रुग्णालय येथे बरेच दिवस एक्स रे मशिन बंद असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पेंडुर ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन उपनिवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. इंगळे, डॉ. संजय पोळ, डॉ. गोदम मॅडम यांच्याशी चर्चा करून रुग्णालयाची पाहणी केली. रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

पेंडुर ग्रामीण रुग्णालयात एक्स-रे मशीन, E.C.G मशीन नियमित चालू ठेवण्यात याव्यात, आठवड्यातून दर मंगळवारी व गुरुवारी गरोदर महिला यांची तपासणी, महिला प्रस्तुती हि संबंधित पेंडुर रुग्णालयात करण्यात यावी, हॉस्पिटलमध्ये स्वच्छता ठेवावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी यांनी उपनिवासी डॉ. इंगळे यांच्याजवळ केली. तसेच पेंडुर रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू करून ग्रामस्थांची गैरसोय दूर केल्याबद्दल शिवसेना पदाधिकारी यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ यांचे अभिनंदन केले. सुरू केलेल्या डायलिसिस सेंटर, एक्स-रे मशीन, इसीजी मशीन बाबत व ओपीडी बाबत पुन्हा तक्रार आल्यास खपवून घेतले जाणार नाही, असेही ठणकाहून सांगितले. येणाऱ्या प्रत्येक रुग्णास चांगल्या प्रकारे सेवा देण्यात यावी असे सांगितले.

यावेळी दर मंगळवारी व गुरुवारी गरोदर महिला यांची तपासणी केली जाईल, असे आश्वासन उपनिवासी डॉ. इंगळे यांनी यावेळी दिले. यावेळी पेंडुर वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ यांनी शिवसेना पदाधिकारी यांनी मागणीनुसार लवकरात लवकर जे एक्स-रे मशीन मध्ये काही तांत्रिक बाबी मध्ये बिघाड आहे तो लवकरात लवकर दुरुस्त करून पुन्हा चांगल्या प्रकारे रुग्णांना सेवा देण्यात येईल, असे सांगितले. तसेच यापुढील काळात कोणत्याही रुग्णाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, योग्य पद्धतीनेच रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यात येतील, असे देखील सांगितले.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, पेंडुर विभागप्रमुख शिवा भोजने, युवासेना विभागप्रमुख वंदेश ढोलम, नांदोस माजी सरपंच अशोक नांदोसकर, विभाग समन्वयक भूषण ढोलम, ग्रामपंचायत सदस्य बाबू टेंबुलकर, डॉ.गजानन पाकरे, डॉ. धीरज शेटये, नर्स प्रिया हडकर, सौ.रणदिवे मॅडम, सौ. तळावडेकर, पेंडुर शाखाप्रमुख पेंडुर निलेश हडकर, बाळकृष्ण मसुरकर, देवा रेवडेकर, जगदीश मोरजकर, निखिल वाईरकर, बाबल गावडे, निखिल शिरोडकर, प्रकाश भोसले, श्री. आवळेगावकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page