महवितरणच्या अधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांची मागणी..
कणकवली : महावितरणने हरकुळ बुद्रुक गावात स्मार्ट मिटर बसविण्यास सुरूवात केली आहे. मीटर बसविण्याचे काम त्वरित थांबवावे, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य राजू पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, हरकुळ बुद्रुक गावात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम चालू आहे. हे काम त्वरित थांबवावे तसेच ज्या ग्राहकांच्या घरी नवीन मीटर बसवले. त्या ग्राहकांचे बिल मोठ्या प्रमाणात निदर्शनात आलेले आहे. तरी त्या ग्राहकांचे मागील बिलप्रमाणे आकारणी करावी. ग्रामसभेमध्ये स्मार्ट मीटर न बसवण्याचे ठराव झालेला आहे. गावामध्ये रात्रंदिवस किमान दहा वेळ तरी लाईट येत जात असते. महावितरणच्या भोंगळ कारभाराची पालकमंत्र्यांकडे ग्रामस्थांनी तक्रार करण्यात आली होती. तरीसुद्धा रात्रंदिवस लाईट येत जात असते यावर उपाययोजना करावी. हरकुळ बुद्रुक गावठणवाडीमध्ये तीस घर असून रात्रीच्या वेळी कामी दाबाचा विद्युत पुरवठा होत असल्यामुळे विद्युत उपकरणे व्यवस्थित चालत नाही. याबाबत महावितरणकडे सहा महिन्यांपूर्वी तक्रार केलेली होती.
तत्कालीन अधिकारी व विद्युत ठेकेदार श्री. अवताडे यांनी पंधरा दिवसांच्याआत होल्टेज वाढून देतो, असे आश्वासन दिले होते. अद्याप काहीच उपाययोजना केलेली नाही. वीज ग्राहकांच्या समस्या मार्गी लावाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनदेतवेळी चंद्रकांत परब, निलेश तेली, भूषण वाडेकर, इम्रान शेख , मामा माणगावकर , प्रकाश तेली, अमर गावकर रमेश मसुरकर ,बाबुल पटेल ,जाकीर पटेल ,असिफ शेख , मनीषा देवळी, तुकाराम मोडक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.