⚡सावंतवाडी ता.१९-: राजमाता श्रीमंत सत्वशीलादेवी भोंसले यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले, तसेच चेअरमन सौ शुभदादेवी खेमसावंत भोंसले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून चित्रकलेसारख्या सृजनात्मक क्षेत्रांमध्ये सहभाग वाढवण्याचे आवाहन केले.
स्पर्धेत पुढील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले:
प्रथम क्रमांक – यश निलेश धुरी (इ. १२वी – विज्ञान)
द्वितीय क्रमांक – भुवन बाबू हाळस्कर (इ. १२वी – विज्ञान)
तृतीय क्रमांक – नील सत्यवान बांदेकर (इ. १२वी – कला)
याशिवाय प्रोत्साहनपर पुढील विद्यार्थ्यांना देण्यात आली:
- सर्वेश संतोष जाधव (इ.१२वी – वाणिज्य)
- प्रीती सीताराम गावडे (इ.१२वी – विज्ञान)
कार्यक्रमाचे आयोजन सुरळीत व प्रेरणादायी झाले. यावेळी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त लखमसावंत खेमसावंत भोंसले. संस्थेचे सदस्य डॉ. सतीश सावंत, जयप्रकाश सावंत संस्थेचे संचालक प्रा.डी.टी. देसाई, सहसंचालक अॅड.श्यामराव सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा.व्ही. पी. राठोड या सर्वांनी विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक करत उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.