विद्यार्थी गुणागौरवसुद्धा होणार:पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती..
कुडाळ : कुडाळ तालुका भंडारी समाजाचा भव्य मेळावा आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा रविवारी २० जुलै रोजी होणार आहे.
सिद्धिविनायक हॉल कुडाळ येथे सकाळी दहा वाजता हा मेळावा होत असून या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य, बंदर विकास मंत्री नितेश राणे उपस्थित राहणार आहेत.
भंडारी समाजातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला अखिल भारतीय भंडारी समाजाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर, जिल्ह्याचे अध्यक्ष हेमंत करगुटकर, माजी अध्यक्ष मामा माडये, उद्योजक महादेव आंदुर्लेकर, पं स माजी सभापती संजय वेंगुर्लेकर, वासुदेव पावसकर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला समस्त भंडारी बांधव आणि हितचिंतक यांनी उपास्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला दहावी, बारावी, एन एम एम एस, स्कॉलरशिप व इतर क्षेत्रात यश मिळविलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. तरी विद्यार्थी पालक यांनी सिद्धिविनायक हॉल येथे उपस्थित रहावे. असे आवाहन समाजाचे अध्यक्ष् अतुलजी बंगे, सरचिटणीस शरदजी पावसकर यांनी केले आहे.